सामाजिक  : गुरुदत्त शुगर्स कडून कोरोना लसीकरणासाठी ५० हजार सिरिंज प्रदान : इतर साखर कारखान्यांना आदर्श

शिरोळ :

कोरोना महामारीच्या काळात आपण सर्वजन मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित  अंतर या त्रिसुत्रीचे पालन करून कोरोनाचा सामना करीत आहोत. कोरोना होऊ नये यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय असून काही ठिकाणी लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या  सिरिंजचा मात्र तुटवडा जाणवत आहे. ही बाब सामाजीक कार्यात अग्रेसर असणारे  गुरूदत्त कारखान्याचे चेअरमन श्री. माधवराव घाटगे यांना सांगण्यात आली.यावेळी  लसीकरणासाठी कोणताही अडथळा येऊ नये व जास्तीत जास्त लोकांचे लसीाकरण व्हावे म्हणून सैनिक टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रास 50 हजार सिरिंज त्वरीत देण्याचा निर्णय श्री. माधवराव घाटगे यांनी घेतला आहे

कारखान्यांचे संचालक मा. संजय गायकवाड यांच्या मार्फत तालुका आरोग्य अधिकारी डॉ . प्रसाद दातार व वैद्यकिय अधिकारी डॉ. मंगल ऐनापुरे यांच्याकडे 50 हजार सिरिंज किट प्रदान करण्यात आले.  टाकळी आरोग्य केंद्र अंतर्गत सैनिक टाकळी, टाकळीवाडी, अकिवाट, बस्तवाड, नवे व जुने दानवाड, दत्तवाड, घोसरवाड, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर या गावातील ग्रामस्थाकरीता कोरोना लसीकरणासाठी या सिरिंजचा उपयोग केला जाणार आहे.

यावेळी बोलताना डॉ. दातार म्हणाले, गुरूदत्त शुगर्स प्रत्येक नैसर्गिक संकटात नेहमीच पुढे येऊन लोकांना आधार देत आला आहे.  कोरोना काळात घाटगे यांनी वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले असता उच्यांकी 2040 रक्तदात्यांनी रक्तदान केले, 2019 व 2005 च्या महापुरात हजारो पूरग्रस्त व जनावरांना ‘गुरुदत्त’ ने आसरा दिला, 2018 साली तालुक्यात लाळ – खुरकत साथ आली असता संपूर्ण तालुक्यातील हजारो जनावरांचे लसीाकरण करून पशु धन वाचवण्यात यश आले होते. विकलांग बांधवांना 350 जयपूर फुट प्रधान  करण्यात आले होते व केरळ महापूरात ही पूरग्रस्तांना घटनास्थळी जाऊन जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले होते.

कोरोना काळामध्ये गुरूदत्त ने केलेल्या कार्याचा उल्लेख करताना वैदयकिय अधिकारी डॉ. ऐनापुरे म्हणाल्या, पाच हजार ऊस तोडणी मजूरांना तसेच जयसिंगपूर, शिरोळ व कुरूंदवाड नगरपालिका क्षेत्रातील रिक्षाचालक, जोतिबा डोंगर येथील पुजाऱ्यांना मानवतेच्या भावनेतून एक महिन्याचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. कारखाना परिसरातील 12 गावामध्ये औषध फवारणी बरोबर लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 30 हजार ग्रामस्थांना आर्सनिक आल्बम गोळया देण्यात आल्या. तसेच डॉक्टर्स, नर्सस पोलिस व पत्रकार या कोरोना यौद्धयांना सॅनिटायझर व पीपीई किट ही देण्यात आले होते.

कोरोना संकट काळात प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत केलेल्या मदतीबदल यावेळी अनेक मान्यवरांनी ‘गुरुदत शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे व संचालक मंडळाचे कौतुक करून आभार मानले. कार्यक्रमाला सरपंच हर्षदा पाटील, उपसरपंच सुदर्शन भोसले व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलीस  सुनिता पाटील, डॉ. मनोज गायकवाड, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी,  नागरिक उपस्थित होते. आरोग्य सेवक अमोल कोळी यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!