गोकुळ निवडणुक : रविवारी (दि.२) मतदान :१२ तालुक्यात एकूण ७० केंद्र : प्रत्येक मतदान केंद्रावर ५० मतदारांचे मतदान होणार
कोल्हापूर :
गोकुळ निवडणुकीसाठी रविवारी (दि.२) मतदान होत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर १२ तालुक्यात एकूण ७० केंद्र करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर ५० मतदारांचे मतदान होणार आहे, अशी माहिती करवीर प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

गोकुळ साठी ३६५६ पात्र मतदार होते.
यामध्ये ६ संस्थांचे ठराव न आल्याने एकूण पात्र ठरावधारक मतदार ३६५० निश्चित झाली. ३ ठरावधारकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता या निवडणुकीत ३६४७ मतदारांचे मतदान होणार आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तालुकानिहाय ७० मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. करवीर तालुक्यातील सर्व मतदान कोल्हापूर शहरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या आवारातील इमारतीमधील, पन्हाळा तालुक्यातील मतदान वाघबीळ येथील फोर्ट अकॅडमीच्या इमारतीमध्ये होणार आहे. तर इतर सर्व ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळा आणि महाविद्यालयामध्ये होणार आहे.