आणखी एक बडा नेता लवकरच येणार : आमदार पी.एन.पाटील
मोठ्या मताधिक्याने आमचे पॅनेल निवडणूक येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास
कोल्हापूर :
चारशे कोटींच्या ठेवी असणारा गोकुळ हा देशातील एकमेव संघ. कोरोनाच्या अडचणीच्या काळात या ठेवी असल्यामुळे दूध उत्पादकांना दर देऊ शकलो. सभासदांना चांगला दर देण्याची भूमिका संघाने कायम घेतली आहे. राज्याचे गोकुळसारखा चांगला दर देणारा, अडचणीच्या काळात सभासदांना आर्थिक स्थैर्य देणारा दुसरा संघ दिसला नाही. त्यामुळेच
माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आणखी एक बडा नेता लवकरच पाठिंबा जाहीर करतील असा खुलासाही आमदार पी.एन.पाटील यांनी यावेळी केला. त्यामुळे हा नेता कोण असेल याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी व अशोक आण्णा चराटी यांनी पाठिंबा जाहीर केला. यावर आणखी कोण राहिले आहे का ? पाठिंबा द्यायचे असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना आमदार पाटील बोलत होते.
यावेळी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास ढळल्याची टीका केली जात असल्याकडे लक्ष वेधले असता आमदार पी.एन.पाटील म्हणाले, आमचा आत्मविश्वास अजिबात कमी झालेला नाही. आम्ही किंवा आमचे पॅनेल स्वतः हून कोर्टात गेलोच नाही. आमचा आत्मविश्वास आहे की, आमचे पॅनेल
मोठ्या मताधिक्याने निवडणूक येणार असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार पी.एन.पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सत्ताधारी पॅनेलला पाठिंबा जाहीर केलेले अशोक आण्णा चराटी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील, जनार्दन पाटील, सावकार मादनाईक उपस्थित होते.