कोल्हापूर :

महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या नारी शक्ती पुरस्कार 2021 करिता इच्छुक महिलांनीwww.narishaktipuraskar.wcd.gov.in/ www.wcd.nic.in  या वेबसाईटवर दि. 3 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीम. एस. डी. शिंदे यांनी केले आहे.

महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या आर्थिक सामाजिक सक्षमीकरण व उन्नतीकरिता सामाजिक कार्य करणा-या व्यक्ती किंवा स्वयंसेवी संस्थांना  केंद्र शासनामार्फत नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो.  पुरस्कारासाठी अर्जदार महिलेचे वय 1 जुलै 2020 रोजी 25 वर्षे पूर्ण असावे. महिलेने महिला व बाल विकास, क्रिडा, कला, विज्ञान सांस्कृतिक, इ. क्षेत्रात काम केल्याचा 5 वर्षाचा अनुभव असावा.

अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी www.narishaktipuraskar.wcd.gov.in / www.wcd.nic.in  या संकेतस्थळावर माहिती पाहुन नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह ऑनलाईन भरण्याच्या सूचनाही महिला बाल कल्याण विभागामार्फत करण्यात येत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!