भोगावती पाणीपुरवठा संस्थेच्या अध्यक्षपदी सागर पाटील : उपाध्यक्षपदी रामदास पाटील बिनविरोध
करवीर ;
दोनवडे ता. करवीर येथील भोगावती सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या अध्यक्षपदी सागर परशराम पाटील, तर उपाध्यक्ष रामदास महादेव पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
संचालक मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळू ज्ञानू पाटील होते .
कुंभी बँक माजी संचालक, माजी सरपंच संजय पाटील, केदारलिंग विकास सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाजीराव पाटील , संचालक पी जी पाटील ,दिलीप जाधव ,रामदास बंडू पाटील, पांडुरंग सातपुते, रवी साळोखे, संजय तेलवेकर, सोनबा पाटील, बाजीराव जाधव, सचिव शंकर खोंद्रे उपस्थित होते. आभार संचालक अजित चौगले यांनी मानले.