करवीर :
करवीर पंचायत समितीच्या नूतन उपसभापतीपदी काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील गटाचे
अविनाश कृष्णात पाटील (वाकरेकर ) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शितल भामरे मुळे यांनी काम पाहिले. यावेळी सभापती मीनाक्षी पाटील, गटविकास अधिकारी जयवंत उगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवडीनंतर उपसभापती अविनाश पाटील यांचा श्रीपतरावदादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील, जि.प.सदस्य राहुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंचायत समिती सभागृहाबाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.
उपसभापती सुनील पोवार यांनी ठरल्याप्रमाणे आपला कार्यकाल संपल्यानंतर आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसभापती पद रिक्त झाले होते. त्यामुळे आज झालेल्या निवडप्रसंगी सकाळी उपसभापतीपदासाठी नामनिर्देशनसाठी अविनाश पाटील यांचा एकमेव अर्ज आला होता. दुपारी दोन वाजता सभापती निवडीसाठी कार्यक्रमाला सुरुवात झाली. अविनाश पाटील यांचे नाव मावळते उपसभापती सुनील पोवार यांनी सुचविले, पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे तहसीलदार शीतल मुळे भामरे यांनी घोषित केले. .
यावेळी
जि.प.सदस्य सुभाष सातपुते,अमर पाटील,
सदस्य, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, प्रदीप झांबरे, सागर पाटील, विजय भोसले, सविता पाटील, अर्चना खाडे, नेताजी पाटील, सागर पाटील, चंद्रकांत पाटील, इंद्रजीत पाटील, अश्विनी धोत्रे, यशोदा पाटील, शोभा राजमाने, यांच्यासह यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील, डॉ.के.एन.पाटील, वाकरे सरपंच वसंत तोडकर, विजय पोवार,कुंडलिक पाटील,सुनील पाटील,राऊसो पाटील, पै.अशोक माने,सुभाष पाटील,
कृष्णा धोत्रे, सरदार पाटील,पिंटू माने,
जयसिंग पाटील , काँग्रेसचे कार्यकर्ते, वाकरे ग्रामस्थ उपस्थित होते.