शेतकरी आर्थिक अडचणीत
सातारा :
सातारा जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर,टोमॅटो भाजीपाल्याची पिके घेण्यास पसंती दिली आहे.बाजारपेठेत कोबीची,आणि टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली,यामुळे कोबीला,आणि टोमॅटोला किलोला केवळ एक रुपये इतका कमी दर मिळत आहे. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून आर्थिक नुकसान ही मोठ्या प्रमाणात झाले आहे.
सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस पीक घेतले जाते, मात्र यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे त्यामुळे यंदा जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
यंदा कोबीचे अडीच हजार हेक्टर क्षेत्र जिल्ह्यात आहे. त्यामुळे कोबीचे उत्पादन वाढले आहे.
परिणामी कोबीचा दर पडला आहे, कोबी शेती केलेल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातच कोबी ट्रॅक्टरच्या साह्याने गाढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.
तसेच यंदा टोमॅटो पिकाचे चार हजार हेक्टर क्षेत्र आहे. टोमॅटोचे उत्पादन चांगले मिळाले आहे. यामुळे टोमॅटो चा दर पडला आहे. सध्या टोमॅटोला एक रुपये किलो दर बसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सुनील तांबे, रा. बाळने, ता महाबळेश्वर, शेतकरी प्रतिक्रिया,
यावर्षी टोमॅटोचे चार प्लॉट केले. टोमॅटोचे भरघोस उत्पादन मिळाले. मात्र एक रुपया किलोला दर मिळत आहे. उत्पादन खर्च ही भागत नाही. त्यामुळे व्याजाचा,कर्जाचा डोंगर वाढणार आहे.डोक्यावरून टोमॅटो घेऊन जाऊन गावोगावी फिरून विक्री करावी लागत आहे. फिरून दोन रुपये किलोला भाव मिळत आहे. शासनाने अशावेळी उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यायला हवा.