कुंभी कासारीवर राज्यस्तरिय नरके चषक फुटबॉल स्पर्धा
करवीर :
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. डी. सी. नरके यांच्या पुण्यतिथीनिमित्त खुल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते २० फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धेचे आयोजन सांगरूळ फुटबॉल क्लब यांच्यावतीने करण्यात आल्याची माहिती संभाजी नाळे व शिवाजी डबल यांनी दिली.
या स्पर्धेची माहिती देताना संभाजी नाळे म्हणाले माजी आमदार चंद्रदीप नरके व अजित नरके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण फुटबॉल चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील पहिल्या २२ संघांना आणि शहरी भागातील पहिल्या १६ संघांना प्राधान्य दिले आहे. प्रथम क्रमांक विजेत्यांना २१ हजार द्वितीय क्रमांक विजेत्याला १५ हजार, तृतीय क्रमांक विजेत्यांना ११ हजार रुपये रोख व भव्य डी.सी. नरके चषक देणार देण्यात येणार आहे. स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक विजेत्याला ७ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे.
याशिवाय स्पर्धेत व्यक्तिगत कौशल्य दाखवणाऱ्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच,बेस्ट फॉरवर्ड बेस्ट डिफेन्स, बेस्ट गोली बक्षिसे देण्यात येणार आहेत.