जिल्ह्यात १ लाख ९५ हजार शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत
कोल्हापूर :
जिल्ह्यासह
राज्य भरात प्रामाणिकपणे सन २०१९/२० वर्षातील नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी सरकारने मंत्रिगटाची उपसमिती नियुक्ती केली होती.जिल्ह्यात सुमारे एक लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलेले आहे. या शेतकऱ्यांना सुमारे ७०० कोटी रुपयांची रक्कम, किंवा निधीचा लाभ मिळणार आहे.या कर्जमाफीचे ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार कधी ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी महिन्यापूर्वी शासकीय विश्रामग्रह कोल्हापूर येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधला होता.आणि या अनुदानाची माहिती दिली होती.
आता यंदाचा हंगाम संपत आला आहे. यामुळे या कर्जमाफी ची चर्चा शेतकरी व विकास संस्था येथे सुरू झाली आहे. घोषणा करून एक वर्ष झाले, यातरी आर्थिक वर्षात हे पैसे मिळतील का ? अशी मागणी शेतकऱ्यांच्या तुनही होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ४६ हजार ९१८ शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपयांची कर्जमाफी रक्कम वाटप केली आहे.यामध्ये काही आधार कार्ड, बँक पासबुक जोडलेले नसल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही असे चित्र आहे.
पीक कर्ज मुदती बाहेर जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सोने गहाण ठेवून,काही ठिकाणी खासगी सावकार कडून कर्ज काढून नियमित कर्ज फेडले आहे.असे
जिल्ह्यात सुमारे एक लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलेले आहे. या शेतकऱ्यांना सुमारे ७०० कोटी रुपयांची रक्कम किंवा निधीचा लाभ मिळणार आहे .
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांनी ज्या बँकेकडून कर्ज घेतले त्याच बँकेला संबंधित शेतकऱ्यांची माहिती द्यायला सांगितली होती.महाविकास आघाडीने यासाठी ” महात्मा फुले कर्ज माफी योजना” जाहीर केली होती.
शेतकऱ्यांनी विविध बँकांची कर्जे घेतली, असली तरी पहिल्यांदा ज्या बँकेकडून कागदपत्रे येतात त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार होते.महाविकासआघाडी सरकार कर्जमाफीसाठी बांधील आहे. मात्र कोरोना मुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, आता महसुल वाढत आहे. यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा अनुदान देण्यासाठी शासनाने उपसमिती गठीत केली आहे .अशी माहिती यावेळी देण्यात आली होती.
त्यानुसार शेतकऱ्यांना जाहीर झालेली कर्जमाफी दिली जाणार होती. कोल्हापूर जिल्ह्यात प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. यंदाच्या उसाची एफआरपी ही दोन महिने मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या वर पीक कर्ज, किसान सहाय्य, खावटी कर्ज, मध्यम मुदत कर्ज, या कर्जांना व्याजाचा भुर्दंड बसत आहे. गेल्या वर्षीची जाहीर केलेली कर्जमाफी न दिल्यास, यावर्षीचे कर्ज शेतकरी यांच्याकडून भरले जाणार नाही,ते ५० हजार रुपये व्याजासह मिळावे अशी भूमिका शेतकरी,तानाजी मोरे, उत्तम पाटील कोगे यांनी व्यक्त केली.
_______________________
एकनाथ पाटील, यशवंत बँक अध्यक्ष
नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांना अनुदान वेळेवर न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. तरी राज्य शासनाने तातडीने मार्चच्या आत शेतकऱ्यांचे ५० हजार रुपये द्यावेत.
पी एन पाटील आमदार,
कोरोना मुळे सरकारची आर्थिक परिस्थिती नव्हती, अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे, नियोजन केले आहे, पैसे द्यायचे ठरले आहेत, राज्यभराचा हा प्रश्न आपण अधिवेशनात मांडला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर लवकरात लवकर पैसे दिले जातील.
जिल्ह्यात १ लाख ९५ हजार वेळेवर प्रामाणिकपणे कर्ज भरलेले शेतकरी. सुमारे ७०० कोटी रुपयांची गरज, राज्य शासनाकडून फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे, यंदा तरी पैसे मिळतील का, अशा पोस्ट सोशल मीडियावर, व्हाट्सअप वर सर्वत्र फिरत आहेत.