करवीर :
करवीर तालुक्यातील बालिंगा ( ता.करवीर ) येथील क्रांती बॉईज मंडळाचे माजी अध्यक्ष कै. अमित सदाशिव खोत यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ मंडळाच्या वतीने व वैभवलक्ष्मी ब्लड बँक यांचे सहकार्याने बालिंगे हायस्कूल बालिंगे येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोरोना काळात रक्तपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला.
नूतन सरपंच मयूर मधुकराव जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकरराव जांभळे, ग्रामसेवक शिवाजी वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच मयूर जांभळे व सदस्य सचिन माळी यांनी रक्तदान करून उपक्रमात सहभाग घेतला. रक्तदान शिबिर पार पडल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते व गावचे सरपंच मयूर जांभळे यांच्या उपस्थितीत स्मशानभूमीची साफसफाई करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी अविनाश कोरवी,अभिजित भाट, संदीप कोरवी ,मनोज कोरवी, सुहास कांबळे,शिवाजी वाडकर, युवा सेना करवीर अध्यक्ष अजय वाडकर, संग्राम कांबळे,नागेश पाटील,अशोक राजेशिर्के,निलेश पाटील,राकेश घुंगरकर,राजेश शिंदे,ऋषिकेश कांबळे, नागेश कांबळे,करण कांबळे,संतोष कांबळे,प्रथमेश वाडकर, रोहित आयवाले,पार्थ मेथी आदींचे सहकार्य लाभले.