कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (गुरुवार) दिवसभरात ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच २२१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील ११, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १ आणि इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ अशा १५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर कोल्हापूरातील राजारामपुरी ३ गल्ली येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.